et cetera संबंधी

विषयाचं बंधन न ठेवता लिहायला हा ब्लॉग सुरू केलाय. इथे माहिती, आवडलेलं (इतरांचं) साहित्य, अघळपघळ असं काहीही असेल.

सुखकर्ता दुखहर्ता

10:18 AM Edit This 0 Comments »
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी;
पुरवी प्रेम, कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती

रत्न खचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुम केशरा
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपूरे चरणी घागरिया

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रीनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना


- समर्थ रामदास