et cetera संबंधी

विषयाचं बंधन न ठेवता लिहायला हा ब्लॉग सुरू केलाय. इथे माहिती, आवडलेलं (इतरांचं) साहित्य, अघळपघळ असं काहीही असेल.

कुछ ऐसा भी होता है

4:56 PM Edit This 0 Comments »
कुछ ऐसा भी होता है,
के आप दोस्त थे
लेकिन, फ़िर,
आप दोस्त न रहे
बीत गयी दोस्ती और दिन-राते
और
खाली हो गया इक झरना

कुछ ऐसा भी होता है
के आप हमदम थे
लेकिन, फ़िर,
आप हमदम न रहे
बीत गया प्यार, और दिन-राते
और
खाली हो गया एक झरना
बगीचे में

किसी रोज़ दिल किया,
कि करे उन से इज़हार
मगर फ़िर मन न हुआ
कि करे उन से इज़हार
फ़िर,
बीत गयी थी घडी़ 
गुजर गया था लम्हा
राख बन के
खो गये सारे अरमाँ-ओ-सपने
अचानक

फ़िर कभी ऐसा होता है,
कि कही भी न जाना है
पर ... कही तो जाना है
सब पार कर के
फ़िर निकल पडे,
और सदिया बीत गयी
शायद, इक पल में

अब क्या खोना है?
अब क्या पाना है?
सोच रहे,
के इस से क्या लेना देना है?
और जान गये,
के इस से न कोई लेना देना है! 
बंद हुआ अब फ़र्क पडना
थम गया अब फ़िक्र करना
और
खाली हो गया है इक झरना
बगीचें में



ब्रायन पॅटर्न यांच्या "समटाईम्स् इट् हॅपन्स्" ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद करण्याचा प्रयत्न केलाय. कसा जमलाय हे तुम्हीच ठरवा. मूळ कविता मी फ़ेसबुकवर वाचली. इंटरनेटवर शोधल्यावर ह्या ब्लॉगपोस्टमध्ये सापडली.

जाली

4:09 PM Edit This 0 Comments »
इंटरनेटला आंतरजाल हा मराठीतला पर्यायी शब्द ज्या माणसाने अस्तित्वात आणला, त्याच्यापेक्षाही त्यचे "जाल" हे लघुरूप लोकप्रिय करणाऱ्या जनसमुदायाचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. व्हर्च्युअल या शब्दाचा "रियल नाही ते" एवढाच अर्थ घेतल्यास इंटरनेटवरील सर्व वर्च्युअल गोष्टींना "जाली" म्हणायची सोय त्यामुळे झाली.

आरोग्य

5:52 PM Edit This 0 Comments »
पेशव्यांच्या राजवटीत पेशवेबाईंनी घातलेलं लिंबाचं लोणचं आज टिकलं असेल तर आयुर्वेदाच्या दृष्टीने कदाचित् पाचक म्हणून उत्तम असेलही. पण पोट भरायला रोजचा ताजा स्वयंपाकच आवश्यक आहे. पेशवेकालीन स्वयंपाकाइतका चविष्ट नसला तरी तो ताजा असणं हेच आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे

सुभाषित

8:21 PM Edit This 1 Comment »
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

(या सुभाषिताच्या अर्थाबद्दल श्री. राजीव उपाध्ये यांचे आभार)

ख / ख़

5:47 PM Edit This 2 Comments »
खयाल में ख कौनसा? "खटमल"वाला या "ख़ुदगर्ज़"वाला?

एन्क्रिप्शन

2:00 PM Edit This 1 Comment »
विवेके करावे कार्य साधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूडील भविष्यार्थी मन ।
हाटेचि नये ।
चालु नये असन्मार्गी ।
त्यता बाणल्या अंगी ।
घुवीरकृपा ते प्रसंगी ।
दासमहात्म्य वाढवी ।।
जनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।।
दिमाया मूळभवानी ।
हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।।

समर्थ रामदासस्वामींनी हे श्लोक पत्ररूपाने शिवाजी महाराजांना पाठवले होते. त्यात प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर वाचल्यास "विजापूरचा सरदार निघाला आहे" असं वाक्य होतं. शेवटच्या दोन ओळींमध्ये काळजी घ्यावी असे सांगितले आहे. समर्थ रामदासस्वामींच्या प्रतिभेच्या अनेक कळसांपैकी हाही कळस शब्दातीत आहे. शिवथरघळ येथे हे उपलब्ध आहे. चंद्रशेखरकाका साने, यांच्यामुळे हे शब्द समजलेत. धन्यवाद सानेकाका.

श्री रामदास स्वामीकृत श्रीसूर्यस्तुती

11:05 PM Edit This 0 Comments »
नरेंद्र गोळे यांच्या ब्लॉगवर रामदासकृत सूर्यस्तुती सापडली. रामदास स्वामींच्या इतर काव्यांप्रमाणेच ही सूर्यस्तुतीही अप्रतीम आहे.

जयाच्या रथा एकची चक्र पाहीं ।
नसे भूमि आकाश आधार काहीं ॥
असे सारथी पांगुळा ज्या रथासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १ ॥

करी पद्म माथां किरीटी झळाळी ।
प्रभा कुंडलांची शरीरा निराळी ॥
पहा रश्मि ज्याची त्रिलोकास कैसी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ २ ॥

सहस्त्रद्वये दोनशे आणि दोन ।
क्रमी योजने जो निमीषार्धतेन ॥
मना कल्पवेना जयाच्या त्वरेसी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ३ ॥

विधीवेदकर्मास आधारकर्ता ।
स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता ॥
असे अन्नदाता समस्तां जनांसीं ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ४ ॥

युगे मंत्रकल्पांत ज्याचेनि होती ।
हरीब्रह्मरूद्रादि त्या बोलिजेती ॥
क्षयांतीं महाकाळरूप प्रकाशी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ५ ॥

शशी तारका गोवुनी जो ग्रहांते ।
त्वरें मेरू वैष्टोनियां पूर्वपंथें ॥
भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ६ ॥

समस्तां सुरांमाजि तूं जाण चर्या ।
म्हणोनीच तू श्रेष्ठ त्या नाम सूर्या ॥
दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशीं ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ७ ॥

महामोह तो अंधकारास नाशी ।
प्रभा शुद्ध सत्त्वाची अज्ञान नाशी ॥
अनाथा कृपा जो करी नित्य ऐसी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ८ ॥

कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची ।
न पाहू शके शत्रु त्याला विरिंची ॥
उभ्या राहती सिद्धी होऊन दासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ९ ॥

फळे चंदनें आणि पुष्पे करोनी ।
पुजावें बरें एकनिष्ठा धरोनी ॥
मनी इच्छिले पाविजे त्या सुखासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १० ॥

नमस्कार साष्टांग बापा स्वभावें ।
करोनी तया भास्करालागीं घ्यावें ॥
दरिद्रें सहस्त्रादि जो क्लेश नाशी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ ११ ॥

वरी सूर्य आदित्य मित्रादी भानू ।
विवस्वान इत्यादिही पादरेणू ॥
सदा वांच्छिती पूज्य ते शंकरासी ।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १२ ॥